मालाड पश्चिम येथे अवनि फूड वॅन चे उदघाटन!!
आज दिनांक 29 जुलै 2024 रोजी ध्रुव नर ह्या लाभार्थीची HDFC बँक समोर, भारत हॉटेल शेजारी, एस वी रोड मालाड पश्चिम येथे अवनि फूड वॅनचे उदघाटन करण्यात आले.
ह्या वॅन चे उदघाटन उद्धव ठाकरे गट शिवसेना शाखा प्रमुख शाखा क्रमांक ४६ चे मा.श्री.कैलास कणसे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या वॅन साठी विशेष करून त्यांचे मोलाचे सहकार्य आहे.
ध्रुव नर ह्यांना शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ (OBC) मधून सदर व्यवसाय कर्जाच व्याज परतावा मिळणार आहे.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com