उच्चशिक्षित तरुणी सुद्धा उतरली रस्त्यावरअवनी फूड वॅनवर लघुउद्योग करण्यासाठी!!!
एकंदरीत महाराष्ट्र पाहता किंबहुना मुंबई मध्ये टिकायचे असेल तर व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नाही हे आता मराठी तरुणाईला कळून चुकलेय.
प्राची ह्या तरुणीला सुद्धा कित्येक महिन्यापासून व्यवसाय करण्याचे वेध लागले होते पण तिला योग्य मार्गदर्शन अथवा भांडवल मिळत नव्हते. तिचे वडील दादर येथे विठ्ठल मंदिराकडे हार, फुलांचा छोटा उद्योग करत असतात. हीच प्राचीची तळमळ होती कि कुटुंबाला आर्थिक हातभार लावायचा असेल तर उद्योग करण्याशिवाय पर्याय नाही.
अशावेळी अवनि वॅन संदर्भात तिला सोशल मीडिया मार्फत माहिती मिळाली आणि तिने मनाशी ठरवले कि ह्या माध्यमातून आता रस्त्यावर उतरूनच व्यवसाय केला पाहिजे.
कारण तिच्या बरोबर असंख्य तरुणीना फक्त सरकारची लाडकी बहीण योजनाच माहित होती मात्र असे काही सरकारी अनुदानातून आपण विविध प्रकारचे व्यवसाय करू शकतो ह्याबद्दल तिने कुठे वाचले किंवा ऐकले सुद्धा नव्हते.
आज प्राचीने तिची अवनि फूड वॅन दादर पश्चिम येथे आशिश इंडस्ट्री कडे उभी केली आहे. त्याचे औपचारिक उदघाटन माझ्या हस्ते करण्यात आले.







अनिल फोन्डेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
9820030971
9987238461