अवनि गारमेंट वॅन चे उदघाटन
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर
शिवडी, मुंबई येथे बस डेपो जवळ अवनि गारमेंट वॅन चे उदघाटन करण्यात आले.
प्रीती जैस्वाल ह्या जरी उत्तरप्रदेश च्या असल्या तरी त्यांच्या कैक पिढ्या ह्या मुंबई मध्ये वास्तव्यास आहेत. शिवाय प्रीती ताई ने तर मराठी शाळेतून मराठी भाषेतूनच संपूर्ण शिक्षण घेतले ह्या पेक्षा त्या “मी मुंबईकर “म्हणून काय पुरावा हवाय आणि इतकेच नाही तर त्यांच्या सगळ्या बहीण भावानी पण मराठीतून शिक्षण घेतलेय.
प्रीती जैस्वाल ह्यांच्या रक्तात शेवटी छोटा मोठा उद्योगच करावा हे यूपीचे संस्कार असल्याने त्या ह्या ना तो व्यवसाय करत असतात आणि आपल्या घराच्या आर्थिक घडीला वळण देत असतात.
अशातच त्यांनी आमच्याशी संवाद साधून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत अवनी गारमेंट वॅन करून घेतली.
ह्या वॅन मध्ये लहान मुलांपासून मोठ्यांचे सर्वच कपडे विक्री साठी ठेवले आहेत.




अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com