बदलापूर ला पहिली अवनि फूड वॅन चालू!!!
आकाश भालेराव तरुण इथे तिथे छोट्या मोठ्या नोकऱ्या करून कंटाळला होता त्यात पगार हाथात मिळणार मोजकाच.
आकाश राहायला वांगणीला आणि तिथून तो मुंबई रोज ये जा करून उदरनिर्वाह साधन म्हणून नोकरीं करायचा. शेवटी त्याने मनाशी ठरवले कि ह्या पुढे जगायचे तर व्यवसाय करूनच. मग काय त्याच्याकडे 1 वर्षा पूर्वीचा कॅटरिंग कामाचा अनुभव होताच आणि अशातच त्याला फोर्ट मुंबई ला अवनि ची एक फूड वॅन दिसली. तिथे त्याने आमच्या कार्यालयाचा पत्ता घेऊन आमच्याकडे माहिती घेऊन ठरवलेच कि त्याला व्यवसाय करायचंय. त्याची तळमळ बघून मी त्याला त्याची अवनि वॅन त्याला मिळेल असे वचन दिले आणि अखेरीस त्याचे आज आमच्याकडून त्याचे स्वप्न पूर्ण झाले.
आज दि. 11 में 2025 रोजी मनसे बदलापूर चे शहर अध्यक्ष निशांत मांडवीकर ह्यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यांच्या बरोबर बदलापूर शहर चे इतर मान्यवर पदाधिकारी उपस्तिथ होते. आणि आनंदाची बाब म्हणजे लवकरच बदलापूर शहर मध्ये ह्या सरकारी योजनेतून मिळणाऱ्या अवनि वॅन साठी सेमिनार होणार आहे ते बदलापूर च्या तरुण तरुणीसाठी. मग बदलापूर वासियांनो लवकरच आपली भेट होईल


धन्यवाद
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
9820030971
9987238461