एल. एल. बी. तरुण कळंबोली, पनवेल येथे चालवतोय अवनि फूड वॅन
प्रतीक सोमवंशी ह्या मराठी तरुणाने नुकतेच एल एल बी शिक्षण कर्नाटक लिंगायत कॉलेज, कळंबोली येथून पूर्ण केले आणि त्याच कॉलेजच्या जवळ महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत LLB वडेवाले ह्या नावाने अवनि फूड वॅन चालू केली.
आज सोमवार 21 एप्रिल 2025 रोजी ह्या अवनि फूड वॅन चे उदघाटन करण्यात आले.रायगड मनसे जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर ह्यांच्या शुभ हस्ते ह्या वॅन चा शुभारंभ करण्यात आला. त्याच बरोबर पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले, मनसे तालुका अध्यक्ष रामदास पाटील, मनसे कळंबोली शहर अध्यक्ष राहुल चव्हाण हे सुद्धा उपस्तिथ होते.
तसेच ह्या विभागातील रहिवासी, इतर व्यापारी ह्यांनी सुद्धा प्रतीकचे मनापासून अभिनंदन करून त्याच्या व्यवसायला शुभेच्छा देताना दिसल्या.





अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र