दादर, छबीलदास स्कूल जवळ संगीता जाधव ह्या लाभार्थीच्या अवनि फूड वॅनचे उदघाटन*!!
आज 28 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना अध्यक्ष तसेच मनसे उपाध्यक्ष आणि दादर माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष मा. श्री. यशवंत किल्लेदार ह्यांच्या शुभहस्ते दादर छबिलदास हायस्कुल जवळ संगीता जाधव ह्या लाभार्थीच्या अवनि फूड वॅन चे उदघाटन करण्यात आले.
तसेच ह्या शुभ प्रसंगी मनसे सरचिटणीस मा. श्री. कीर्तिकुमार शिंदे हेही आवर्जून उपस्तिथ होते.
संगीता ताईंनी ह्या वॅन वर इडली, डोसा वगैरे नाष्ट्या पासून दुपारचे जेवण सुद्धा विक्री करण्यास ठेवले आहे.
आपण अधून मधून दादर ला जात असणारच तर आपल्या शुद्ध मराठमोळी संगीताताईच्या हाताचे शुद्ध पदार्थ खायला या आणि ह्या मराठी उद्योजिकेला सहकार्य करा तसेच प्रोत्साहनपर पाठिंबा द्याल ही मीं आशा करतो.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र