सरकारी अनुदानावर उद्योग आणि सरकारी भरती नोकरीं मार्गदर्शन शिबीर संपन्न!!!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रोजगार स्वयंरोजगार विभाग पुरस्कृत महाराष्ट्र रोजगार संघटना आणि मुंबई व्यापारी आयोजित
केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध अनुदान योजना आणि 2024 वर्षात तब्बल 1.5 लाख केंद्र शासन नोकऱ्या असे मार्गदर्शन शिबीर शुक्रवार 23 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई 400001 येथे संपन्न झाले.
ह्याकरिता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, नारी शक्ती व्यवसाय योजना, मुद्रा, स्टॅन्ड अप, स्टार्ट अप अशा विविध व्यवसाय कर्ज अनुदान योजनाचे मार्गदर्शन करण्यासाठी विविध सरकारी अधिकारी उपस्थित होते. शिवाय केंद्र शासनाच्या रेल्वे, बँक, इन्शुरन्स, पोस्ट, स्टाफ सिलेक्शन, आईबींपीएस अशा विविध क्षेत्रातील नोकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी करियर मेकर्स अकादमी चे संस्थापक प्राध्यापक संजय मोरे उपस्थित होते.
ह्या प्रसंगी स्पर्धा परीक्षा तंत्र आणि माहिती पुस्तिका प्रकाशन करून वितरण करण्यात आले.
विविध जिल्ह्यातून ह्या शिबिरासाठी मराठी तरुण तरुणी हजर होते हे विशेष!!
हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता मनसे रोजगार स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अनिल फोंडेकर, संजय लोणकर, विधी विभाग उपाध्यक्ष ऍड. प्रांजल जाधव, मुंबई व्यापारी असोसिएशन उपाध्यक्ष प्रज्ञा मोहिते, महाराष्ट्र रोजगार संघटना सरचिटणीस अभिषेक फोंडेकर, ओमकार फोंडेकर आणि उपाध्यक्ष शमीन भोसले विशेष मेहेनत घेतली.