कोल्हापूर येथे अवनि फेस्टिवल चा शुभारंभ!!
आज दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी कोल्हापूर येथे, काँग्रेस कमिटी तर्फे युवा अध्यक्ष अंजली ताई जाधव ह्यांच्या माध्यमातून महिला बचत गट मेळावा आयोजित केला होता. ह्या प्रसंगी मंगळगौर स्पर्धाचे नियोजन केले होते. आणि ह्या कार्यक्रमात अवनि वॅन संदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता आम्हाला विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
ह्या प्रसंगी साधारण 200 ते 225 महिला उपस्तीथ होत्या त्यातील 33 महिलांना लॉटरीद्वारे विशेष सवलत देऊन अवनि वॅन देणार असे घोषित केले.
सदर कार्यक्रमात कोल्हापूरच्या आमदार जयश्रीताई जाधव ह्या विशेष उपस्थित होत्या. त्यांनी सदर योजनासाठी त्यांच्या मतदारसंघातील गरजू महिलांना ह्या अवनि वॅन कशा देता येतील म्हणून अवनि फेस्टिवलच्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत.
ह्या कार्यक्रमात कोल्हापूर काँग्रेसच्या युथ उपाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग तसेच डॉक्टर स्मिता गिरी ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
धन्यवाद
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
9820030971
9987238461
www.avnivan.com