ओबीसी महामंडळ मंत्री अतुलजी सावे ह्यांची भेट घेऊन ओबीसी समाजातील तरुणांच्या स्वयंरोजगार बद्दल गाऱ्हाने मांडले.
आज दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी ओबीसी महामंडळ अध्यक्ष आणि मंत्री महोदय मा.श्री. अतुलजी सावे ह्यांची शिवगड बंगल्यावर,मंत्रालय भेट घेऊन ओबीसी समाजाच्या तरुणांना शासनातर्फे स्वयंरोजगार अनुदान मिळताना काय समस्या आहेत त्या व्यथा मांडल्या.
मंत्री महोदयांनी आम्ही केलेल्या सर्व तक्रारी समजून घेतल्या आणि तातडीने त्यांच्या स्वीय सहाय्यकला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
ह्या प्रसंगी मुंबई व्यापारी असोसिएशन उपाध्यक्ष प्रज्ञा मोहिते,महाराष्ट्र रोजगार संघटना सरचिटणीस अभिषेक फोंडेकर, ओमकार फोंडेकर आणि पालघर उपाध्यक्ष शामिन भोसले उपस्तिथ होते.
अनिल फोंडेकर
संस्थापक /अध्यक्ष
महाराष्ट्र रोजगार संघटना